वनलाईन वेलनेस प्रा. लि. च्या एमडी आणि स्पा आणि वेलनेस इंडस्ट्रीत खास ओळख निर्माण करणाऱ्या रेखा चौधरी यांच्या क्रियाकलांमुळे त्यांच्या डोक्यावर अजून एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. नुकतेच इंडिया हॅबिटेट सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या सोर्बन आंतरराष्ट्रीय कॉनव्होकेशन कार्यक्रमात रेखा चौधरी यांना ‘फिलॉसॉफी डॉक्टर होनोरिस कौसा’ ह्या सन्मानाने गौरविण्यात आले. आयआयपीपीटी फाउंडेशन इंडिया च्या संयुक्त विद्यमाने फ्रान्समधील सोर्बन विद्यापीठातील डॉ. जॉन थॉमस प्राडे यांनी आयोजित केलेल्या ह्या हेल्थ आणि वेलनेस क्षेत्राच्या कॉनक्लेव्ह येथे रेखा चौधरी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात एक नवे विकास पर्व सूरु झाल्यावर त्वचेसमवेत नैसर्गिक सौंदर्य आणि वेलनेस याला एक नवे स्थान मिळाले. ह्याच कारणामुळे ब्युटी आणि वेलनेसचे विशेषज्ञ प्रखर प्रकाशाच्या झोताखाली आहेत. पंचवीस वर्षाच्या कठोर परिश्रमाने रेखा चौधरी यांनी ह्या क्षेत्रात आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.  त्या भारताच्या ग्लोबल वेलनेस अँबॅसेडर आहेत. रेखा चौधरी ह्या वेलनेस इंडस्ट्री आणि खान्देशातील प्रथम महिला आहेत ज्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. 

आपला आनंद व्यक्त करत रेखा चौधरी म्हणाल्या की, “पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा मी सौंदर्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी शहरात आले होते तेव्हाचा काळ खूप कठीण होता आणि जेव्हा मी स्पा आणि वेलनेस क्षेत्रात प्रवेश केला होता तेव्हा ही तीच परिस्थिती होती. यशाचा रस्ता खूपच खडतर होता हे मला कळून चुकले होते आणि त्यामुळे मी माझे परिश्रम चालूच ठेवले. मला आनंद आहे की मला पुरस्कारप्राप्त युरोपीयन स्किनकेअर अन्स एसपीए ब्रँड्स, रॅमी लॉरे, फायटोमर, एएसपी आणि बी.एल.बी. यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. जगभरातील हाय-एंड लक्झरी स्पाशी संलग्न होऊन काम आणि स्वत: चा जुहू  येथील लोकप्रिय कॅरेसा डे स्पा, जिओ थर्मो थेरपी आणि रोप मसाज थेरपीसारख्या माझ्या विविध पेटंट ट्रीटमेंट्स्ने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करायला मिळाले. आम्ही ग्रामीण आदिवासी तरूणांना सौंदर्य आणि निरोगीपणाचे प्रशिक्षण देखील दिले आहे आणि स्पा आणि सलून या शहरांमध्ये नोकरी देऊन तेथे जीवनात यशस्वीरित्या परिवर्तन घडवून आणले आहे. फ्रान्सच्या सोर्बन युनिव्हर्सिटीतील डॉ. जॉन थॉमस प्राडे यांनी मला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे! आपण निवडलेल्या व्यवसायात आपल्या योगदानासाठी ओळखले जाणे ही भावनाच खूप छान आहे.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *